-
पावसाळ्यात आणि दमट हवामानामुळे जास्त घाम येणे, त्वचा तेलकट होणे, त्वचेची छिद्रे बंद होणे आणि पिंपल्स येणे यांसारख्या समस्या वाढतात.
-
त्वचेची छिद्रे स्वच्छ ठेवण्यासाठी आणि पिंपल्स कमी करण्यासाठी दिवसातून दोनदा सौम्य आणि सल्फेट-मुक्त फेस वॉशने चेहरा धुवा.
-
छिद्रे बंद न होता त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी हलके, जेल-आधारित किंवा वॉटर-बेस्ड मॉइश्चरायझर वापरा.
-
पावसाळ्यातही दररोज सकाळी ‘ब्रॉड-स्पेक्ट्रम’ सनस्क्रीन नक्की लावा. जर जास्त वेळ बाहेर असाल, तर दर २-३ तासांनी ते पुन्हा लावा.
-
वारंवार चेहरा धुण्याऐवजी चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल पुसण्यासाठी ‘ब्लॉटिंग पेपर’ किंवा स्वच्छ टिश्यूचा वापर करा.
-
त्वचा थंड आणि फ्रेश ठेवण्यासाठी हलका फेशिअल मिस्टही वापरू शकता.
-
भरपूर पाणी प्या. तसेच आहारात टरबूज, काकडी आणि लिंबूवर्गीय फळांसारख्या पाण्याचे प्रमाण जास्त असलेल्या फळ-भाज्यांचा समावेश करा.
-
यामुळे त्वचा आतून निरोगी आणि चमकदार राहण्यास मदत होते.
‘कंपनीला कुटुंब मानण्याची चूक करू नका’, दोन वर्षांच्या मुलासह लॅपटॉप द्यायला गेलेल्या कर्मचाऱ्याला मिळाला धडा