-
तृणमूल काँग्रेसच्या (TMC) माजी खासदार आणि बंगाली चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री नुसरत जहाँ (Nusrat Jahan) सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
-
नुसरत यांनी नुकतेच पती आणि प्रसिद्ध बंगाली अभिनेता यश दासगुप्तासह (Yash Dasgupta) मध्य प्रदेशातील प्रसिद्ध ज्योतिर्लिंग महाकालेश्वर आणि ओंकारेश्वरचे दर्शन घेतले.
-
यश दासगुप्ता यांनी महाकाल-ओंकारेश्वरचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
या फोटोंना यश दासगुप्ता यांनी ‘हर हर महादेव’ असे कॅप्शन दिले आहे.
-
नुसरत जहाँ यांनी २०१९ मध्ये व्यावसायिक निखिल जैन यांच्याशी तुर्कीमध्ये विवाह केला होता. मात्र, वर्षभरातच त्यांचा संसार मोडला. तुर्कीच्या कायद्यानुसार झालेला हा विवाह भारतात कायदेशीर नसल्याचा दावा नुसरत यांनी केला होता.
-
ऑगस्ट २०२१ मध्ये नुसरत यांनी मुलगा ईशानला (Yishaan) जन्म दिला.
-
मुलाच्या जन्मदाखल्यावर वडिलांचे नाव ‘देबाशिष दासगुप्ता’ (यश दासगुप्ता यांचे अधिकृत नाव) नोंदवल्याने त्यांच्या नात्याची अधिकृत पुष्टी झाली.
-
सुरुवातीला दोघांनीही आपल्या लग्नाबाबत गुप्तता पाळली होती. मात्र, नंतर सोशल मीडियावरील फोटो आणि मुलाखतींच्या माध्यमातून आपण पती-पत्नी असल्याचे त्यांनी जाहीर केले.
-
(सर्व फोटो सौजन्य : नुसरत जहाँ/इन्स्टाग्राम)
पोटात वाढलेली आठ किलो वजनी गाठ काढण्यात यश; ठाणे पालिका रुग्णालयातील डॉक्टरांच्या पथकाद्वारे शस्त्रक्रिया