-
झी मराठीवरील ‘कमळी’ मालिका सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस पडत असून, त्यात विजया उत्तम कामगिरी करीत आहे.
-
मालिकेत अभिनेत्री विजया बाबर कमळी ही मुख्य भूमिका साकारत असून, तिच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
-
विजयाने आपल्या साध्या आणि सोज्वळ अभिनयाने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात हक्काचे स्थान निर्माण केले आहे.
-
नुकतेच मालिकेचे कलाकार चित्रीकरणाच्या व्यग्र वेळेतून ब्रेक घेऊन लोणावळा येथे फिरायला गेले होते.
-
सफरीदरम्यानचा एक खास फोटो विजयाने नुकताच तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केला आहे.
-
या फोटोमध्ये विजयाने पिवळ्या रंगाचा अतिशय सुंदर आणि आकर्षक वन पीस परिधान केलेला दिसत आहे.
-
हा सुंदर फोटो पोस्ट करीत तिने ‘all things easy’ अशी कॅज्युअल आणि मस्त कॅप्शन दिली आहे.
-
विजयाचा हा स्टायलिश फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून, त्यावर चाहत्यांकडून लाइक्सचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: विजया बाबर/इन्स्टाग्राम)
पोटातली सगळी घाण झटक्यात बाहेर पडेल; झोपण्याआधी फक्त ‘हे’ एक पान चावून खा; आतड्यांत सडणारी घाण होईल साफ