-
हेमांगी कवी (Hemangi Kavi) ही मराठी चित्रपट, नाटक आणि मालिकांमधील लोकप्रिय व दमदार अभिनयासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री आहे.
-
नाटकांतून अभिनयाचा श्रीगणेशा करणाऱ्या हेमांगीने पुढे अनेक मालिका आणि चित्रपटांतून प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे हक्काचे स्थान निर्माण केले.
-
सध्या हेमांगी सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी महाराष्ट्रातील ‘भदाणे’ या निसर्गरम्य ठिकाणी गेली होती.
-
या ट्रिप दरम्यान हेमांगीने निसर्गाच्या सानिध्यात एक खास फोटोशूट केले आहे.
-
हे फोटो शेअर करत हेमांगीने “काही जागा फक्त आठवणी बनून राहतात, तर काही तुमच्या हृदयाचं घर बनतात…” अशी सुंदर ओळ लिहिली आहे.
-
हेमांगीच्या या फोटोंवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
-
नेहमी आपल्या रोखठोक व बिनधास्त वक्तव्यांसाठी चर्चेत असणारी हेमांगी पुन्हा एकदा सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : हेमांगी कवी/इन्स्टाग्राम)
पोटात वाढलेली आठ किलो वजनी गाठ काढण्यात यश; ठाणे पालिका रुग्णालयातील डॉक्टरांच्या पथकाद्वारे शस्त्रक्रिया