-
मराठी चित्रपटसृष्टीची ‘अप्सरा’ अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) सध्या तिच्या नवीन फोटोशूटमुळे सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे.
-
सोनालीने नुकतेच तिचा पती कुणाल बेनोडेकरबरोबर (Kunal Benodekar) एक भन्नाट फोटोशूट केले आहे.
-
या फोटोंमध्ये सोनालीने गुलाबी रंगाचा पैठणी ब्लेझर आणि डेनिम जीन्स परिधान करून एक हटके लूक केला आहे.
-
कुणालने निळ्या रंगाचा शर्ट आणि डेनिम जीन्स परिधान करत त्याला उत्तम साथ दिली आहे.
-
सोनालीने ७ मे २०२१ रोजी दुबईतील एका मंदिरात अत्यंत साध्या पद्धतीने कुणालबरोबर लग्नगाठ बांधली होती.
-
कुणाल हा मूळचा लंडनचा रहिवासी असून पेशाने चार्टर्ड अकाउंटंट आहे आणि सध्या दुबईमध्ये कार्यरत आहे.
-
फेब्रुवारी २०२१ मध्ये दुबईतच सोनाली आणि कुणालचा साखरपुडा पार पडला होता.
-
(सर्व फोटो सौजन्य : सोनाली कुलकर्णी/इन्स्टाग्राम)
VIDEO: ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दिपकेंची पंतप्रधान मोदींकडे नवी मागणी; मध्यरात्री व्हिडिओ पोस्ट करत म्हणाले…