-
अभिनेता रितेश देशमुख दिग्दर्शित ‘वेड’ (Ved Movie) या गाजलेल्या चित्रपटातून मराठी अभिनेत्री जिया शंकर (Jiyaa Shankar) घराघरात पोहोचली.
-
या चित्रपटात जियाने रितेशच्या ‘निशा काटकर’ या प्रेयसीची भूमिका साकारली होती. याच चित्रपटाद्वारे तिने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले.
-
जियाने यापूर्वी अनेक हिंदी मालिका, चित्रपट आणि रिॲलिटी शोमध्ये काम केले आहे. विशेषतः ‘बिग बॉस ओटीटी’मधील तिच्या सहभागामुळे ती खूप चर्चेत आली होती.
-
नुकताच जियाचा साखरपुडा पार पडला असून तिने याचे काही सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
जियाच्या होणाऱ्या पतीचे नाव करण असे आहे. फोटोंमध्ये तो चक्क गुडघ्यावर बसून तिला प्रपोज करताना दिसत आहे.
-
या खास प्रसंगी जियाने पिवळ्या रंगाचा आकर्षक गाऊन परिधान केला होता, तर करणने कॅज्युअल शर्ट-पॅण्ट लूक निवडला होता.
-
सध्या सोशल मीडियावर जिया आणि करणच्या या फोटोंवर चाहत्यांकडून आणि कलाकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : जिया शंकर/इन्स्टाग्राम)
आई, गं… याला बोलतात खरा डान्स…. “अधीर मन झाले” गाण्यावर तरूणीचा नादखुळा डान्स; VIDEO पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक