-
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री काजोलने (Kajol Devgan) ५ ऑगस्ट रोजी आपला वाढदिवस साजरा केला.
-
काजोलने तिच्या ५२ व्या वाढदिवसाचे खास सेलिब्रेशन आपल्या कुटुंबाबरोबर केले.
-
९० च्या दशकापासूनच आपल्या दमदार अभिनयाने आणि सहज शैलीने काजोलने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे.
-
काजोलला अभिनयाचा वारसा घरातूनच मिळाला. तिची आई तनुजा या मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री आहेत, तर वडील शोमू मुखर्जी हे प्रसिद्ध चित्रपट निर्माते होते.
-
१९९९ मध्ये काजोलने प्रसिद्ध अभिनेता अजय देवगणशी विवाह केला. त्यांना न्यासा (मुलगी) आणि युग (मुलगा) ही दोन मुले आहेत.
-
वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी ‘बेखुदी’ (१९९२) या चित्रपटातून काजोलने आपल्या अभिनय प्रवासाची सुरुवात केली होती.
-
२०११ मध्ये भारत सरकारने तिला ‘पद्मश्री’ या प्रतिष्ठित नागरी पुरस्काराने सन्मानित केले.
-
काजोलने आपल्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत तब्बल ६ फिल्मफेअर (Filmfare) पुरस्कार पटकावले आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : काजोल/इन्स्टाग्राम)
‘कंपनीला कुटुंब मानण्याची चूक करू नका’, दोन वर्षांच्या मुलासह लॅपटॉप द्यायला गेलेल्या कर्मचाऱ्याला मिळाला धडा