-
बॉलिवूडची “धक धक गर्ल” अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) तिच्या उत्कृष्ट अभिनय, निखळ हास्य आणि अप्रतिम नृत्यासाठी ओळखली जाते.
-
आपल्या खास शैलीच्या जोरावर माधुरीने चित्रपटसृष्टीत एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.
-
माधुरीला तिच्या अभिनयप्र प्रवासासाठी अनेक फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत.
-
भारत सरकारने माधुरीला ‘पद्मश्री’ या मानाच्या नागरी पुरस्काराने सन्मानित केले आहे.
-
अलिकडेच माधुरीने सोशल मीडियावर गुलाबी रंगाच्या पंजाबी ड्रेसमधील काही अत्यंत सुंदर फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंना माधुरीने “आज मनही गुलाबी आहे, आणि दिवसही!” असे खास कॅप्शन दिले आहे.
-
या गुलाबी लूकवर माधुरीने केलेला हलका मेकअप, हिऱ्यांचे कानातले, अंगठी आणि बांगड्या तिच्या सौंदर्यात अधिकच भर घालत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : माधुरी दीक्षित/इन्स्टाग्राम)
आई, गं… याला बोलतात खरा डान्स…. “अधीर मन झाले” गाण्यावर तरूणीचा नादखुळा डान्स; VIDEO पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक