-
लोकप्रिय मराठी अभिनेत्री अमृता खानविलकरने (Amruta Khanvilkar) ‘फिल्मफेअर अवॉर्ड्स मराठी २०२६’च्या (Filmfare Awards Marathi 2026) पत्रकार परिषदेला हजेरी लावली होती.
-
या पत्रकार परिषदेतील तिच्या खास लूकमुळे ती सध्या भलतीच चर्चेत आली आहे.
-
यावेळी अमृताने स्ट्राइप्ड टॉप आणि चेक्सचा स्कर्ट परिधान केला होता.
-
या वेस्टर्न आऊटफिटवर तिने हलका मेकअप आणि मोकळ्या केसांची स्टाईल केली होती, जी तिला खूपच शोभून दिसत होती.
-
पत्रकार परिषदेदरम्यान अमृताने फिल्मफेअरचे संपादक जितेश पिल्लई यांच्याशी संवाद साधला आणि ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’ या श्रेणीतील नामांकनांची (Nominations) अधिकृत घोषणा केली.
-
याप्रसंगी तिने मराठी सिनेसृष्टीची झालेली प्रगती आणि फिल्मफेअर पुरस्कारांचे महत्त्व यावर आपले विचार मांडले.
-
११ वा ‘फिल्मफेअर अवॉर्ड्स मराठी २०२६’ सोहळा ६ ऑगस्ट २०२६ रोजी मुंबईतील ‘हॉटेल सहारा स्टार’ येथे पार पडत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अमृता खानविलकर/इन्स्टाग्राम)
पोटात वाढलेली आठ किलो वजनी गाठ काढण्यात यश; ठाणे पालिका रुग्णालयातील डॉक्टरांच्या पथकाद्वारे शस्त्रक्रिया