-
११ वा मराठी फिल्मफेअर पुरस्कार सोहळा ६ ऑगस्ट रोजी अत्यंत दिमाखात पार पडला. या दिमाखदार सोहळ्याला अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती.
-
या खास सोहळ्यात बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अनन्या पांडे हिची विशेष उपस्थिती सर्वांचेच लक्ष वेधून घेणारी ठरली.
-
अनन्याने या सोहळ्यासाठी अत्यंत खास असा मराठमोळा आणि पारंपरिक लूक परिधान केला होता.
-
तिने या प्रसंगी गर्द निळ्या (रॉयल ब्लू) रंगाची सुंदर पैठणी साडी नेसली होती. साडीच्या पदरावर मोराचे सुरेख नक्षीकाम पाहायला मिळत होते.
-
या साडीसोबत तिने स्ट्रॅपलेस पद्धतीचा ब्लाऊज परिधान करून पारंपरिक आणि मॉडर्न फॅशनचा सुरेख मेळ साधला होता.
-
तिच्या या लूकला अधिक आकर्षक बनवण्यासाठी तिने गळ्यात बारीक नक्षीकाम असलेला पारंपरिक चोकर हार घातला होता.
-
केसांचा नीटनेटका आंबाडा बांधून त्यावर तिने ताजी रंगीबेरंगी फुले माळली होती. कपाळावर छोटीशी टिकली आणि सौम्य मेकअपने तिच्या चेहऱ्याचे सौंदर्य अधिकच खुलवले होते.
-
अनन्याने हे फोटो सोशल मीडियावर शेअर करताच चाहत्यांनी तिच्या या मराठमोळ्या लूकवर लाइक्सचा वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: अनन्या पांडे/इन्स्टाग्राम)
३ दिवसांपासून आतड्यात कुजतोय मल? हे छोटे काळे फळ खा, पोट होईल साफ