-
मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर ही तिच्या उत्तम अभिनयामुळे प्रेक्षकांच्या नेहमीच पसंतीस उतरते.
-
‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेतील शेवंता या भूमिकेने आणि बिग बॉसमधील खेळाने तिने प्रेक्षकांची मने जिंकली होती.
-
अपूर्वा सोशल मीडियावर सक्रिय असून तिच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक आनंदाचे क्षण ती चाहत्यांसोबत शेअर करत असते.
-
नुकतीच ही सुंदर जोडी एका नव्या आणि विशेष प्रवासासाठी एकत्र रवाना झाली आहे.
-
अपूर्वा नेमळेकर ही पती तनुज गोवळकर याच्याबरोबर अमेरिका येथील कॅलिफोर्निया येथे फिरायला जात आहे.
-
विमानातील बिझनेस क्लासमधील प्रवासादरम्यानचे काही सुंदर फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
-
एका फोटोमध्ये दोघेही एकमेकांचा हात अगदी प्रेमाने हातात धरून बसलेले दिसत आहेत.
-
प्रवासादरम्यान विमानात घेतलेला जेवणाचा व डेझर्टचा आस्वाद आणि मनोरंजनाचे क्षण तिने फोटोंमध्ये दाखवले आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य: अपूर्वा नेमळेकर/इन्स्टाग्राम)
३ दिवसांपासून आतड्यात कुजतोय मल? हे छोटे काळे फळ खा, पोट होईल साफ