-
मराठी टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर हिने तिच्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.
-
सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असणारी वैष्णवी नेहमीच तिचे नवनवीन फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते.
-
नुकतेच वैष्णवीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक खास फोटोशूट शेअर केले असून त्यात ती अत्यंत सुंदर दिसत आहे.
-
या नव्या फोटोंमध्ये वैष्णवीने पारंपरिक दक्षिण भारतीय (साऊथ इंडियन) लूक साकारल्याचे पाहायला मिळत आहे.
-
हिरव्या आणि हिरव्या /पोपटी रंगाच्या सुरेख कॉम्बिनेशनच्या हाफ साडीमध्ये तिचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे.
-
गळ्यात सोन्याचा पारंपरिक हार, कानात झुमके, हातात हिरव्या बांगड्या आणि कपाळावर छोटीशी टिकली असा तिचा साऊथ इंडियन साज लक्ष वेधून घेतो.
-
तिने केस अर्धवट बांधून त्यात गजरा माळला असून हातात पांढरी फुले धरून निसर्गरम्य ठिकाणी दिलेली पोज अत्यंत आकर्षक वाटत आहे.
-
हे सुंदर फोटो शेअर करताना तिने पोस्टला ‘Forever in love with the elegance of South India’ असे खास कॅप्शन दिले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य:वैष्णवी कल्याणकर/इन्स्टाग्राम)
इस्रोचं खासगीकरण होणार? खासगीकरणाच्या चर्चांवर ISRO ने केला मोठा खुलासा; निवेदनात काय म्हटलं? वाचा!