-
मराठी अभिनेता भूषण प्रधान (Bhushan Pradhan) आणि अभिनेत्री सायली पाटील (Sayli Patil) यांचा ‘स्वप्नसुंदरी’ (SwapnaSundari Movie) हा चित्रपट २४ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
-
लग्न, योग्य जोडीदाराचा शोध आणि लग्नापूर्वी घातलेली अट या रंजक विषयावर ‘स्वप्नसुंदरी’ चित्रपटाची कथा आधारित आहे.
-
या चित्रपटात भूषणने ‘राघव’ची मध्यवर्ती भूमिका साकारली असून, सायली ‘मानसी’च्या भूमिकेत पाहायला मिळत आहे.
-
नुकतेच भूषण आणि सायलीने एक सुंदर रोमँटिक फोटोशूट केले असून त्याचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत.
-
या फोटोशूटसाठी सायलीने गुलाबी रंगाचा स्टायलिश ब्लेझर सूट परिधान केला आहे.
-
भूषणने या फोटोशूटमध्ये गुलाबी शर्ट आणि पांढऱ्या पॅण्टमधील हँडसम लूक कॅरी केला आहे.
-
या चित्रपटाविषयी बोलताना दिग्दर्शक अक्षय शिंदे म्हणाले, “आजच्या तरुणाईसाठी लग्नाचा निर्णय आणि योग्य जोडीदाराची निवड हा अत्यंत जिव्हाळ्याचा आणि तितकाच गोंधळात टाकणारा विषय बनला आहे.”
-
(सर्व फोटो सौजन्य : भूषण प्रधान/इन्स्टाग्राम)
बऱ्हाणपूरहून आणलेली १२ फुटाची गणेशमूर्ती वाटेतच दुभंगली; जळगावातील मंडळावर स्थापनेपूर्वीच विसर्जनाची वेळ