-
Happy Birthday Prajakta Mali: मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री, निवेदिका आणि निर्माती प्राजक्ता माळीचा आज (८ ऑगस्ट) वाढदिवस!
-
वाढदिवसाचे औचित्य साधून प्राजक्ताने पुण्यातील प्रसिद्ध सारसबागेतील श्री सिद्धिविनायक मंदिर आणि आई तळजाई मातेचे दर्शन घेतले. देवाचे आशीर्वाद घेत तिने आपल्या नवीन वर्षाची सुरुवात केली आहे.
-
प्राजक्ताने ‘सुवासिनी’ या मालिकेतून मुख्य अभिनेत्री म्हणून आपल्या अभिनय प्रवासाला सुरुवात केली होती.
-
त्यानंतर झी मराठीवरील ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेतील ‘मेघना’ या तिच्या भूमिकेला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आणि प्राजक्ता घराघरात पोहोचली.
-
‘हंपी’, ‘पावनखिंड’, ‘पांडू’, ‘चंद्रमुखी’, ‘वाय’ आणि ‘फुलवंती’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांतील प्राजक्ताच्या भूमिका विशेष गाजल्या.
-
केवळ अभिनयच नव्हे, तर सोनी मराठीवरील अत्यंत लोकप्रिय ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोच्या खुमासदार सूत्रसंचालनाने प्राजक्ताने महाराष्ट्रातील प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
-
अभिनयाबरोबरच प्राजक्ता एक यशस्वी उद्योजिकादेखील आहे; ‘प्राजक्तराज’ या तिच्या पारंपरिक मराठी दागिन्यांच्या ब्रँडला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्राजक्ता माळी/इन्स्टाग्राम)
रात्री झोपण्यापूर्वी हळदीचे दूध प्यायल्यास शरीरास कोणते फायदे मिळतात? वाचा डॉक्टरांचा सल्ला