-
प्रसिद्ध मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरचा (Sai Tamhankar) ‘बोल बोल राणी’ (Bol Bol Rani Movie) हा चित्रपट १७ जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे.
-
या चित्रपटाची कथा १९७० मध्ये भालचंद्र सुळे यांनी लिहिलेल्या ‘आणखी एक नारायण निकम’ या प्रसिद्ध नाटकावर आधारित आहे.
-
सिड विंचुरकर यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट एक ‘सस्पेन्स थ्रिलर’ आहे. एका सत्याचा शोध आणि त्यादरम्यान उलगडणारे विविध पैलू याभोवतीच चित्रपटाची रंजक कथा फिरते.
-
या चित्रपटात सईसह अभिनेता चिन्मय मांडलेकर, संभाजी ससाणे, सुबोध भावे, पद्मनाभ बिंड, माधुरी भारती आणि धनंजय सरदेशपांडे हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.
-
सईने नुकतेच एका खास लूकमध्ये स्टायलिश फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी सईने काळ्या रंगाचा एक सुंदर डिझायनर ड्रेस परिधान केला आहे.
-
या काळ्या ड्रेसमधील लूकवर सईने केलेला हलका मेकअप आणि तिची हटके हेअरस्टाईल चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सई ताम्हणकर/इन्स्टाग्राम)
भारतात सगळ्या बाटल्यांमध्ये एकच मद्य? व्हिस्की, रम आणि व्होडकामध्ये नेमका फरक काय?