-
आपल्या पाळीव प्राण्यांवर जीव जडला की त्यांच्यासह आपलं अन्न वाटून खाणं अगदी स्वाभाविक वाटतं. पण माणसांसाठी पौष्टिक असलेलं अन्न प्राण्यांसाठी सुरक्षित असेलच असं नाही. त्यांच्या शरीराची पचनसंस्था वेगळी असते, त्यामुळे त्यांना काही नेहमीचे पदार्थ दिल्यास गंभीर आजार होऊ शकतात. चला जाणून घेऊया, कोणते पदार्थ आपल्या लाडक्या पाळीव प्राण्यांच्या ताटापासून दूर ठेवले पाहिजेत.
-
ॲव्होकॅडो : जरी हे फळ माणसांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जात असले, तरी पाळीव प्राण्यांसाठी ते अजिबात योग्य नाही. यातील ‘पर्सिन’ नावाचा घटक त्यांच्या पोटाला त्रास देऊ शकतो.
-
चॉकलेट : चॉकलेट हा तुमचा आवडता पदार्थ असला, तरी प्राण्यांसाठी ते एक प्रकारचे ‘स्लो पॉयझन’ आहे. यामुळे त्यांना अस्वस्थता, हृदयाचे ठोके वाढणे आणि उलट्यांसारखे गंभीर त्रास होऊ शकतात.
-
द्राक्षे आणि मनुका : अगदी मूठभर किंवा २-३ द्राक्षे/मनुका सुद्धा प्राण्यांचे मूत्रपिंड निकामी करू शकतात. त्यामुळे हे पदार्थ त्यांच्या आहारातून पूर्णपणे वगळा.
-
कांदा आणि लसूण : आपल्या रोजच्या स्वयंपाकात कांदा-लसूण वापरला जातो, पण प्राण्यांच्या शरीरातील तांबड्या रक्तपेशी नष्ट करण्याचे काम हे पदार्थ करतात. त्यामुळे हे त्यांना शिजवून किंवा कच्चे अजिबात देऊ नका.
-
साखरमुक्त खाद्यपदार्थ : साखरमुक्त कँडी, च्युइंग गम किंवा बेक केलेल्या पदार्थांमध्ये ‘झायलिटॉल’ नावाचा कृत्रिम गोडवा असतो. कुत्र्यांसाठी हा घटक अत्यंत धोकादायक आहे. याच्या थोड्या सेवनानेही रक्तातील साखर झपाट्याने कमी होऊन यकृत निकामी होऊ शकते. म्हणून प्राण्यांना कोणताही तयार पदार्थ देण्यापूर्वी त्यावरील घटक नक्की तपासा.
-
अल्कोहोल (मद्य): अल्कोहोल पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत विषारी असते. अगदी कमी प्रमाणातही अल्कोहोल पोटात गेल्यास त्यांना उलट्या, जुलाब, श्वास घेण्यास त्रास, शरीराचा तोल जाणे, झटके येणे किंवा थेट कोमा आणि मृत्यूचा धोका संभवतो. त्यामुळे अल्कोहोलयुक्त पेये, गोड पदार्थ आणि न शिजवलेले यीस्टचे पीठ प्राण्यांच्या आवाक्याबाहेर ठेवा.
“मी आदित्य ठाकरेंना…”, दिशा सालियान प्रकरणात नाव आल्यावर सूरज पंचोली म्हणाला, “माझी पुन्हा चौकशी करण्याची गरज…”