-
मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने पती कुणाल बेनोडेकरबरोबरच्या खास ट्रिपचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
शेअर केलेल्या फोटोंमध्ये सोनाली आणि तिचा नवरा कुणाल स्लोव्हेनिया येथील प्रसिद्ध ‘लेक ब्लेड’ परिसरात फिरताना दिसत आहेत.
-
एका फोटोमध्ये सोनाली आणि कुणाल लेक ब्लेडच्या पार्श्वभूमीवर लाल रंगाच्या मोठ्या हार्ट फ्रेमच्या मध्ये उभे राहून एकत्र पोज देत आहेत.
-
पांढऱ्या रंगाचा क्रॉप टॉप आणि जांभळ्या रंगाच्या शॉर्ट्समधील तिचा हा कॅज्युअल समर लूक चाहत्यांच्या भलताच पसंतीस उतरत आहे.
-
एका फोटोमध्ये सोनाली ऐतिहासिक दगडी पायऱ्यांवर उभी राहून अतिशय स्टायलिश पोज देताना पाहायला मिळत आहे.
-
तलावाच्या काठावर उभ्या असलेल्या लाकडी बोटींजवळ उभे राहून तिने आणखी एक सुंदर फोटो क्लिक केला आहे.
-
शहरातील रस्त्यांवर पिवळ्या रंगाची सायकल चालवतानाचा एक आनंददायी क्षणही तिने या फोटोंमधून शेअर केला आहे.
-
या खास फोटोंना तिने ‘A 360 degree of this beautiful Island in the middle of’ अशी कॅप्शन दिली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: सोनाली कुलकर्णी/इन्स्टाग्राम)
वारंवार गोष्टी विसरता? मग मेंदूच्या पोषणासाठी आहारात घ्या ‘हे’ ५ पदार्थ, तज्ज्ञांनी सांगितले फायदे…