-
मराठी मनोरंजन विश्वात आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारी लोकप्रिय अभिनेत्री शिवानी रांगोळे कुलकर्णी सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
-
सध्या ती ‘शंकर जयकिशन’ या गाजणाऱ्या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीस येत असून तिच्या भूमिकेचे विशेष कौतुक होत आहे.
-
नुकतेच तिने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर काही अतिशय सुंदर आणि आकर्षक फोटो पोस्ट केले आहेत.
-
या फोटोंमध्ये शिवानीचा अत्यंत सुरेख आणि फ्रेश असा शिफॉन साडीमधील लूक पाहायला मिळत आहे.
-
फ्लोरल प्रिंटेड शिफॉन साडीसोबत तिने परिधान केलेले गुलाबी रंगाचे रफल स्लीव्हज आणि कॉलर डिझाईन असणारे मॉडर्न ब्लाऊज तिच्या या लूकला अधिकच खास बनवत आहे.
-
या फोटोंना शेअर करत तिने ‘If I were a season, I’d be monsoon!’ अशी सुंदर कॅप्शन दिली आहे.
-
पावसाळ्याचे वातावरण आणि तिच्या या मनमोहक लूकचा सुरेख मेळ या फोटोंमध्ये स्पष्टपणे जाणवत आहे.
-
शिवानीच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत असून तिचा हा लूक सोशल मीडियावर चांगलाच ट्रेंड होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: शिवानी रांगोळे/इन्स्टाग्राम)