-
मराठी चित्रपटसृष्टीची ‘अप्सरा’ म्हणून ओळखली जाणारी लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या युरोप दौऱ्यावर आहे.
-
आपल्या उत्कृष्ट अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या सोनालीने सोशल मीडियावर युरोप व्हेकेशनचे काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
स्लोव्हेनिया येथील प्रसिद्ध लेक ब्लेड (Lake Bled) या ठिकाणी सोनाली सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहे.
-
एका फोटोमध्ये ती लेक ब्लेडच्या निळ्याशार पाण्यात पोहताना दिसत असून, या फोटोत तिच्या लाल मोनोकिनीचा (Monokini) कॉन्ट्रास्ट लूक खूपच खुलून दिसत आहे.
-
लाकडी बाकावर रिलॅक्स मूडमध्ये पडून विश्रांती घेतानाचा तिचा अंदाजही चाहत्यांना पसंत पडला आहे.
-
दुसऱ्या एका फोटोत ती लाल मोनोकिनीमध्ये (Monokini) पाठमोऱ्या पोझमध्ये लेक ब्लेडच्या मनमोहक दृश्याकडे पाहत उभी आहे.
-
तसेच एका फोटोमध्ये सोनाली एका हँगिंग चेअरवर बसून कॅमेऱ्याकडे पाहून मनमोहक स्मितहास्य करताना दिसत आहे.
-
सोनालीचा हा युरोपमधील व्हेकेशन लूक इंटरनेटवर सध्या तुफान व्हायरल होत असून चाहते तिच्या या फोटोंवर लाइक्सचा वर्षाव करत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य: सोनाली कुलकर्णी/इन्स्टाग्राम)
चपातीला तूप लावून खाल्ल्यानं कोणते आजार बरे होतात? त्याचे फायदे जाणून घ्या