-
मराठी अभिनेत्री आकांक्षा गाडेने (Aakanksha Gade) नाटक, मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनात हक्काचे स्थान निर्माण केले आहे.
-
नुकतेच आकांक्षाने वर्सोवाच्या समुद्रकिनारी एक खास फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी आकांक्षाने गडद मोरपंखी टॉप आणि काळ्या रंगाची डेनिम शॉर्ट्स परिधान केली असून, तिचा लूक प्रचंड आकर्षक दिसत आहे.
-
या फोटोशूटचे फोटो शेअर करत आकांक्षाने “Happiness Comes In Waves” असे हटके कॅप्शन दिले आहे.
-
लहानपणापासूनच कलेची आवड असलेल्या आकांक्षाने भरतनाट्यमचे रीतसर शिक्षण घेतले आहे.
-
कलर्स मराठीवरील ‘पिंगा गं पोरी पिंगा’ या लोकप्रिय मालिकेत आकांक्षाने ‘श्वेता’ ही मुख्य भूमिका साकारून घराघरात ओळख मिळवली.
-
याशिवाय आकांक्षाने ‘स्वराज्य जननी जिजामाता’ आणि ‘तू माझा सांगाती’ यांसारख्या गाजलेल्या मालिकांमध्येही महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : आकांक्षा गाडे/इन्स्टाग्राम)
३ दिवसांपासून आतड्यात कुजतोय मल? हे छोटे काळे फळ खा, पोट होईल साफ