-
११ वा मराठी फिल्मफेअर पुरस्कार सोहळा ६ ऑगस्ट रोजी अत्यंत दिमाखात, ग्लॅमरस आणि तारांकित वातावरणात मोठ्या थाटामाटात पार पडला.
-
मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीने नटलेल्या या सोहळ्यात वैदेही परशुरामीच्या रेड कार्पेट लूकची जोरदार चर्चा रंगली होती.
-
तिचा हा पेस्टल पिंक शेडमधील वन-शोल्डर गाऊन अतिशय एलिगंट वाटत असून, खांद्यावरील डिझायनर रोझ कट वर्क गाऊनला अधिक आकर्षक रूप देत आहे.
-
गाऊनला असलेला हाय-थाय स्लिट कट तिच्या या लूकला बोल्ड, ग्लॅमरस आणि एक परफेक्ट मॉडर्न टच देणारा ठरत आहे.
-
या गाऊनसोबत तिने न्यूड-टोन मेकअप, हायलाइट केलेले गाल आणि ग्लॉसी लिपस्टिक निवडत आपला मेकअप अतिशय नॅचरल आणि मिनिमल ठेवला आहे.
-
वन-शोल्डर गाऊनसोबत तिने निवडलेली सिम्पल इयररिंग्स, मॅचिंग हिल्स आणि सुंदर हेअरस्टाइल तिच्या सौंदर्यात भर घालत आहे.
-
या फोटोंना तिने ‘You’re too sweet for me…! Filmfare Night!’ अशी खास कॅप्शन दिली आहे.
-
वैदेहीच्या या ग्लॅमरस आणि एलिगंट अवतारावर सोशल मीडियावर चाहत्यांकडून आणि इतर कलाकारांकडून लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: वैदेही परशुरामी/इन्स्टाग्राम)
प्रारूप यादीतील १ कोटी २२ लाख मतदारांना नोटिसा