-
अभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat) आणि अभिनेता उमेश कामत (Umesh Kamat) ही मराठी मनोरंजन विश्वातील अत्यंत लोकप्रिय जोडी आहे.
-
सध्या हे दोघे ‘जर तरची गोष्ट’ (Jar Tar Chi Goshta Marathi Natak) या प्रसिद्ध नाटकात एकत्र काम करत आहेत.
-
या नाटकाचे कथानक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून जवळ जवळ प्रत्येक प्रयोगाला प्रेक्षक तुफान गर्दी करत आहेत.
-
सध्या या नाटकाचे प्रयोग बंगळुरू येथे सुरू आहेत.
-
या प्रयोगांच्या निमित्ताने प्रिया आणि उमेशने बंगळुरू शहरात छान भटकंती केली.
-
या सफरनाम्याचे काही सुंदर फोटो प्रियाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
हे फोटो शेअर करताना तिने कॅप्शन दिले आहे, “बेंगळूरची सफर – एकाच ट्रिपमध्ये तीन प्रयोग, पोटभर खाणे, सुंदर फुले, गरमागरम कॉफी आणि थोडा व्यायाम… तरीही मन काही भरले नाही!”
-
प्रिया आणि उमेशच्या ‘जर तरची गोष्ट’ या नाटकाचा ४०० वा सुवर्णमहोत्वाची वाटचाल करणारा प्रयोग येत्या रविवारी, १६ ऑगस्ट रोजी प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिर येथे रंगणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्रिया बापट/इन्स्टाग्राम)
“मी आदित्य ठाकरेंना…”, दिशा सालियान प्रकरणात नाव आल्यावर सूरज पंचोली म्हणाला, “माझी पुन्हा चौकशी करण्याची गरज…”