-
‘सावळ्याची जणू सावली’ या प्रसिद्ध मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री भाग्यश्री दळवी हिने सुमेध म्हात्रेबरोबर साखरपुडा केला आहे.
-
हे जोडपे ८.८.२०२६ या खास दिवशी साखरपुड्याच्या रेशीमगाठीत अधिकृतपणे अडकले असून त्यांच्या आयुष्याची ही एक नवी सुरुवात आहे.
-
सोशल मीडियावर साखरपुड्याचे रोमँटिक फोटो शेअर करत अभिनेत्रीने ही गोड बातमी चाहत्यांना दिली.
-
या खास प्रसंगी भाग्यश्रीने लाल काठ असलेली पिवळ्या रंगाची अत्यंत सुंदर पारंपरिक साडी आणि त्यावर शोभून दिसणारा लाल रंगाचा ब्लाऊज परिधान केला होता.
-
तिने पारंपरिक दागिन्यांसह गळ्यात सुरेख हार, कंबरेला पट्टा, हातात बांगड्या आणि केसांत गजरा माळून आपला साडीतील लूक अत्यंत आकर्षक आणि देखणा केला होता
-
सुमेध म्हात्रे याने क्रीम-पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि बॉर्डर असलेले धोतर परिधान करून अगदी साजेसा पारंपरिक पोशाख केला होता.
-
बीचवर काढलेले रोमँटिक फोटो शेअर करत भाग्यश्रीने ‘The Sweetest Date Of Our Life WE GOT ENGAGED’ अशी सुंदर कॅप्शन दिली आहे.
-
सोशल मीडियावर हे फोटो पोस्ट होताच मनोरंजन विश्वातील तिचे कलाकार मित्र, नातेवाईक आणि चाहत्यांकडून शुभेच्छांचा प्रचंड वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: भाग्यश्री दळवी/इन्स्टाग्राम)