-
स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘ठरलं तर मग’मधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री मोनिका दबाडे सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे.
-
नुकतेच मोनिकाने तिच्या सोशल मीडियावर काही नवीन आणि ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत, ज्यांना चाहत्यांची चांगली पसंती मिळत आहे.
-
या नवीन फोटोंमध्ये मोनिकाने गुलाबी रंगाचा एक सुंदर स्लीव्हलेस कुर्ता परिधान केला आहे, ज्यावर छोटे पांढरे नक्षीकाम आहे.
-
या कुर्त्यावर तिने पांढऱ्या रंगाची धोती पॅन्ट परिधान केली असून, त्यावर गुलाबी फुलांचे छोटे नक्षीकाम केले आहे.
-
मोनिकाने या आऊटफिटवर साधा मेकअप केला असून, तिने मोकळ्या केसांची हेअरस्टाईल निवडली आहे, ज्यामुळे ती अधिकच सुंदर दिसत आहे.
-
तिने आपल्या लूकला अधिक आकर्षक बनविण्यासाठी चंदेरी रंगाचे झुमके आणि हातामध्ये एक सुंदर घड्याळ घातले आहे.
-
या फोटोंना तिने ‘मी’ अशी कॅप्शन दिली आहे. चाहत्यांनी तिच्या या फोटोंवर कमेंट्स करीत तिच्या सौंदर्याचे खूप कौतुक केले आहे.
-
मोनिका सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते आणि ती आपले नवीन फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांशी संवाद साधत असते.
-
(सर्व फोटो सौजन्य: मोनिका दबाडे/इन्स्टाग्राम)
“छत्रपती शिवरायांनी अफझल खानाचा कोथळा काढला तेव्हा डीजे वाजवून आनंद साजरा केला नव्हता”; संजय राऊत यांचं विधान