-
६ ऑगस्ट रोजी ११ वा मराठी फिल्मफेअर पुरस्कार सोहळा अत्यंत थाटामाटात आणि उत्साहात पार पडला असून, या कार्यक्रमाला अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती.
-
फिल्मफेअरच्या रेड कार्पेटवर मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळीनेही आपल्या खास उपस्थितीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
-
या सोहळ्यातील तिचे सुंदर फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले असून, तिचा हा ग्लॅमरस लूक सध्या चांगलाच चर्चेत आहे.
-
यावेळी तिने परिधान केलेल्या लाल रंगाच्या स्ट्रक्चर्ड कॉर्सेट डिझायनर गाऊनमध्ये तिचे सौंदर्य खूपच खुलून दिसत आहे.
-
या गाऊनवर प्राजक्ताने गळ्यात डायमंडचा नाजूक नेकलेस आणि हातात अंगठी घालून आपला लूक पूर्ण केला आहे.
-
केस वर बांधून तिने केलेली साधी पण अत्यंत आकर्षक हेअरस्टाईल तिच्या या लूकला अगदी उत्तम प्रकारे सूट होत आहे.
-
या फोटोंना तिने ‘Trust me when I say…’ अशी एक सुंदर कॅप्शन दिली आहे.
-
प्राजक्ताच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सच्या माध्यमातून कौतुकाचा भरभरून वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: प्राजक्ता माळी/इन्स्टाग्राम)
आतड्यांमध्ये कुजलेला मल झटक्यात पडेल बाहेर! फक्त माधुरी दीक्षितच्या नवऱ्याने सांगितलेले ‘हे’ ४ सोपे उपाय करा; पोट होईल पूर्ण साफ!