-
रसिका सुनील (Rasika Sunil) ही मराठी चित्रपट, मालिका आणि रंगभूमीवरील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.
-
झी मराठीवरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतील ‘शनाया’ या लोकप्रिय भूमिकेमुळे ती महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली.
-
काही दिवसांपूर्वी रसिकाने एका दाक्षिणात्य चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्याला खास हजेरी लावली होती.
-
या सोहळ्यात रसिकाच्या ग्लॅमरस लूकला पाहून चाहत्यांनी तिला प्रेमाने ‘नॅशनल क्रश’ ही उपमा दिली.
-
नुकतेच रसिकाने आपल्या बोल्ड लूकचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, जे प्रचंड व्हायरल होत आहेत.
-
या फोटोंमध्ये रसिकाने सोनेरी रंगाची प्लेन सिल्क साडी आणि त्यावर ट्रेंडी ऑफ-शोल्डर ब्लाऊज परिधान केला आहे.
-
आपले हे खास फोटो शेअर करताना रसिकाने त्यांना ‘Feminine And Free’ असे सुंदर कॅप्शन दिले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : रसिका सुनील/इन्स्टाग्राम)