-
अभिनेत्री ऋता दुर्गुळे तिच्या उत्कृष्ट अभिनयशैली आणि खास फॅशन सेन्सद्वारे नेहमीच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेते.
-
‘दुर्गा’ व ‘मन उडू उडू झालंय’ या लोकप्रिय मालिकांमधून ऋताने प्रत्येक मराठी घराघरात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
-
अभिनयासोबतच आपल्या अप्रतिम सौंदर्याने तिने लाखो चाहत्यांच्या मनात हक्काचे स्थान निर्माण केले आहे.
-
ऋता सोशल मीडियावर सक्रिय असून, ती तिचे साडीतील आणि वेस्टर्न आऊटफिटमधील ग्लॅमरस फोटो सतत शेअर करीत असते.
-
नुकतेच तिने इन्स्टाग्रामवर वेस्टर्न लूकमधील काही खास फोटो शेअर केले असून, ते सध्या तुफान व्हायरल होत आहेत.
-
या नव्या लूकसाठी तिने पांढऱ्या रंगाचा क्रॉप टॉप, त्यावर स्टायलिश जॅकेट आणि क्रीम रंगाची पॅन्ट परिधान केली आहे.
-
या वेस्टर्न आऊटफिटवर तिने परिधान केलेले काळे बूट आणि कानातील छोटे टॉप्स तिच्या लूकला अधिक आकर्षक बनवत आहेत.
-
‘Not the usual मूड’ अशी कॅप्शन देत शेअर केलेल्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: ऋता दुर्गुळे/इन्स्टाग्राम)
‘बाय-बाय पापा’; वडिलांशी फोनवर बोलली अन् तरुणीची थेट चिनाब नदीत उडी, व्हिडीओ व्हायरल