-
Apurva Nemlekar Tanuj Govalkar San Francisco Vacation: मराठी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर सध्या पती तनुज गोवळकरबरोबर अमेरिकेची सफर करत आहे.
-
अपूर्वाने तिच्या या ट्रिपचे सुंदर फोटो आणि रील्स इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यांना तिच्या चाहत्यांकडून मोठी पसंती मिळत आहे.
-
या ट्रिपदरम्यान अपूर्वा आणि तनुजने सॅन फ्रान्सिस्कोच्या प्रसिद्ध केबल कारमध्ये एक खास फोटोशूट केले.
-
‘सॅन फ्रान्सिस्को केबल कार’ (San Francisco Cable Car) हे अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील सॅन फ्रान्सिस्को शहराचे प्रमुख आकर्षण आणि ऐतिहासिक प्रतीक मानले जाते.
-
विशेष म्हणजे, ही पूर्णपणे हाताने चालवली जाणारी जगातील एकमेव सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे.
-
या फोटोंमध्ये अपूर्वाने पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि डेनिम जीन्स परिधान केली आहे, तर तनुज पांढरा टी-शर्ट, जॅकेट आणि डेनिम जीन्समध्ये दिसत आहे.
-
१४ फेब्रुवारीला (व्हॅलेंटाईन्स डेच्या मुहूर्तावर) ठाण्यात अपूर्वा आणि तनुजचा मोठ्या थाटामाटात विवाह सोहळा पार पडला होता.
-
(सर्व फोटो सौजन्य : अपूर्वा नेमळेकर/इन्स्टाग्राम)
रात्री झोपण्यापूर्वी हळदीचे दूध प्यायल्यास शरीरास कोणते फायदे मिळतात? वाचा डॉक्टरांचा सल्ला