-
अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांचा राखाडी साडीतील मनमोहक पारंपरिक अंदाज; इन्स्टाग्रामवरील फोटोंवर चाहत्यांकडून पसंतीचा वर्षाव
-
स्टार प्रवाह वाहिनीवर नुकतीच सुरू झालेली ‘आमच्या लाडक्या नाईकबाई’ ही मालिका प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस पडत आहे.
-
या मालिकेत लोकप्रिय अभिनेत्री ऐश्वर्या नारकर या ‘शारदा नाईक’ या शिक्षिकेची मध्यवर्ती भूमिका साकारत असून, त्यांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे.
-
सोशल मीडियावर सतत सक्रिय असणाऱ्या ऐश्वर्या नारकर विविध साड्यांमधील त्यांचे सौंदर्यपूर्ण लूक्स नेहमीच चाहत्यांसोबत शेअर करत असतात.
-
नुकतेच त्यांनी आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर पारंपरिक साडीतील काही अत्यंत सुंदर फोटो पोस्ट केले आहेत.
-
या नव्या फोटोशूटमध्ये त्यांनी लाल आणि हिरव्या रंगाची बॉर्डर असलेली आकर्षक राखाडी रंगाची साडी परिधान केली आहे.
-
राखाडी साडीवर परिधान केलेला काळ्या रंगाचा ब्लाऊज या दोन्ही रंगांचे उत्कृष्ट कॉम्बिनेशन उठून दिसत आहे.
-
ऑक्सिडाइज्ड दागिन्यांची जोड देऊन आणि केसांचा छान आंबाडा बांधून त्यावर सुंदर गजरा माळत त्यांनी हा पारंपरिक लूक पूर्ण केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: ऐश्वर्या नारकर/इन्स्टाग्राम)
इन्स्टाग्रामचा 80s फोटो ट्रेंड तुम्हाला फॉलो करायचाय? वापरा ChatGPT चे ‘हे’ सोपे Prompts