-
अश्विनी महांगडे (Ashwini Mahangade) ही मराठी मनोरंजन विश्वातील एक अत्यंत लोकप्रिय आणि गुणी अभिनेत्री आहे.
-
आपल्या दमदार अभिनयाबरोबरच सामाजिक कार्यातील सक्रियतेमुळे अश्विनीने महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केले आहे.
-
अश्विनीने नुकतेच सोशल मीडियावर आपल्या साडीतील लूकचे काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये अश्विनी मोरपंखी रंगाच्या सुंदर सिल्क साडीमध्ये अत्यंत देखणी दिसत आहे.
-
या पारंपरिक लूकवर अश्विनीने मोजकेच पण सुटसुटीत दागिने परिधान केले आहेत.
-
हे फोटो शेअर करताना अश्विनीने दिलेले कॅप्शन सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. तिने लिहिले आहे, “मनाच्या गाभाऱ्यात उतरलं की सगळे प्रश्न आपोआप विरघळतात…”
-
अश्विनीच्या या साडीतील मनमोहक रूपावर चाहत्यांनी पसंतीची पावती दिली असून, ‘खूप सुंदर’, ‘मस्त’, ‘अप्रतिम’ अशा कमेंट्सचा वर्षाव तिच्या फोटोंवर होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अश्विनी महांगडे/इन्स्टाग्राम)
पाकिस्तानचं लढाऊ विमान पाडणाऱ्या अभिनंदन वर्धमान यांची नवी इनिंग, गोव्यातल्या खासगी कंपनीत वैमानिक म्हणून कार्यरत