-
बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री भूमी पेडणेकर हिने शिव मंदिरात जाऊन भगवान शंकराचे अत्यंत श्रद्धेने आणि भावूकतेने दर्शन घेतले आहे.
-
या धार्मिक दर्शनाचे सुंदर फोटो भूमीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत.
-
मंदिरात दर्शन घेताना भूमीने कपाळावर विभूती आणि टिळा लावला असून, तिने डोक्यावरून ओढणी घेत अत्यंत साध्या पारंपरिक पोशाखात प्रार्थना केली.
-
एका फोटोमध्ये भूमी शिवलिंगावर अत्यंत भक्तिभावाने फुले अर्पण करताना दिसत आहे.
-
दुसऱ्या फोटोत ती शिवलिंगासमोर हात जोडून नतमस्तक होऊन नमन करताना दिसत आहे.
-
मंदिरातील शिवलिंग फुले, कमळाच्या पाकळ्या व रुद्राक्षांच्या माळा यांनी अत्यंत सुंदर रीतीने सजवले आहे.
-
भूमीने या फोटोंसोबत ‘नमः शिवाय Peace and prosperity’ अशी आध्यात्मिक कॅप्शन दिली आहे.
-
नेहमी ग्लॅमरस भूमिकेत दिसणाऱ्या भूमीचे हे आध्यात्मिक रूप सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: भूमी पेडणेकर/इन्स्टाग्राम)
पाकिस्तानचं लढाऊ विमान पाडणाऱ्या अभिनंदन वर्धमान यांची नवी इनिंग, गोव्यातल्या खासगी कंपनीत वैमानिक म्हणून कार्यरत