-
मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय आणि गुणी अभिनेत्री शर्वरी कुलकर्णी-बोरकर ही तिच्या उत्तम अभिनयासोबतच तिच्या खास फॅशन सेन्ससाठी नेहमीच चर्चेत असते.
-
नुकतेच शर्वरीने तिच्या सोशियल मीडिया अकाउंटवर एका सुंदर आणि आकर्षक पारंपरिक लूकमधील नवे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
-
या नव्या फोटोंमध्ये शर्वरीने अत्यंत सुंदर अशी नारिंगी रंगाची कॉटन चंदेरी साडी (Cotton Chanderi Saree) परिधान केली असून ती खूपच लोभसवाणी दिसत आहे.
-
या साडीवर तिने स्लीव्हलेस निळ्या रंगाचा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज परिधान करून तिच्या पारंपरिक लूकला एक मॉडर्न टच दिला आहे.
-
शर्वरीने गळ्यात ट्रेडिशनल चोकर हार, मंगळसूत्र आणि नाकात नाजूक नथ परिधान करून आपल्या सौंदर्यात अधिकच भर घातली आहे.
-
हातामध्ये सुंदर बांगड्या, घड्याळ आणि बोटात अंगठ्या घालून तिने तिचा हा परिपूर्ण लूक अत्यंत व्यवस्थित कॅरी केला आहे.
-
अगदी नैसर्गिक मेकअप आणि प्रसन्न चेहऱ्यामुळे शर्वरीचा हा साडीतील अंदाज चाहत्यांच्या खूपच पसंतीस उतरला आहे.
-
नेहमीप्रमाणेच शर्वरी कुलकर्णी-बोरकरचा हा कॉटन चंदेरी साडीतील ट्रेडिशनल आणि कूल लूक सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: शर्वरी कुलकर्णी-बोरकर/इन्स्टाग्राम)
UPSC क्रॅक केली, IAS झाले, पण दोघांनीही घेतला निरोप; रोमन सैनी आणि दिव्या मित्तल यांचा रंजक प्रवास