-
Filmfare Awards Marathi 2026: लोकप्रिय मराठी अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकरने (Priyadarshini Indalkar) ‘फिल्मफेअर पुरस्कार मराठी २०२६’च्या सोहळ्याला विशेष हजेरी लावली होती.
-
या सोहळ्यात प्रियदर्शिनीला ‘सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री’ (Best Supporting Actress) या श्रेणीमध्ये नामांकन मिळाले होते.
-
फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये नामांकन मिळण्याचे प्रियदर्शिनीचे हे सलग तिसरे वर्ष आहे.
-
या पुरस्कार सोहळ्यासाठी प्रियदर्शिनीने एक खास लूक केला होता; तिने परिधान केलेल्या काळ्या रंगाच्या डिझायनर गाऊनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
-
२०२४ मध्ये ‘फुलराणी’ या चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयासाठी प्रियदर्शिनीला ‘सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्री’चा (Best Debut Actress) फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.
-
त्यानंतर २०२५ मध्ये ‘नवरदेव B.Sc. Agri’ या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी प्रियदर्शिनीला फिल्मफेअर मराठी २०२५ मध्ये ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’चे (Best Actress) नामांकन मिळाले होते.
-
प्रियदर्शिनी ही सोनी मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) या लोकप्रिय शोमधील अचूक कॉमेडी टायमिंग आणि सहज अभिनयासाठी विशेष प्रसिद्ध आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्रियदर्शिनी इंदलकर/इन्स्टाग्राम)
लालचुटूक डाळिंब आरोग्यासाठी ठरते वरदान; जाणून घ्या फायदे