-
प्रसिद्ध अभिनेत्री श्रिया पिळगावकर (Shriya Pilgaonkar) लवकरच ‘मिर्झापूर: द मूव्ही’ (Mirzapur: The Movie) या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
प्राइम व्हिडिओची प्रचंड लोकप्रिय क्राईम-थ्रिलर सीरिज ‘मिर्झापूर’ आता थेट मोठ्या पडद्यावर येत आहे.
-
या वेब सीरिजच्या पहिल्या सीझनमध्ये श्रियाने साकारलेली ‘स्वीटी गुप्ता’ (Sweety Gupta) ही भूमिका कमालीची गाजली होती.
-
पहिल्या सीझनमध्ये मृत्यू दाखवला गेलेला असतानाही, ‘मिर्झापूर: द मूव्ही’च्या टीझर आणि ट्रेलरमध्ये श्रियाची झलक पुन्हा पाहायला मिळाली आहे.
-
नुकताच या चित्रपटाचा भव्य लाँच सोहळा मुंबईत पार पडला.
-
या सोहळ्यात श्रियाने तिच्या ‘हटके’ लूकने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
-
या खास प्रसंगासाठी तिने काळ्या रंगाचा टॉप, प्रिंटेड पॅण्ट आणि त्यावर सुंदर ‘ऑक्सिडाइज्ड’ दागिन्यांचा लूक केला होता.
-
हा चित्रपट पहिल्या सीझनच्या (२०१८) काळातीलच एक समांतर कहाणी मोठ्या पडद्यावर भव्य स्वरूपात मांडणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : श्रिया पिळगावकर/इन्स्टाग्राम)
रोज आंघोळ करणं ठीक, पण साबण रोज लावणं गरजेचं आहे का? त्वचारोगतज्ज्ञ काय सांगतात?