-
नेहा पेंडसे (Neha Pendse) ही मराठी मनोरंजन विश्वासह हिंदी आणि दक्षिण भारतीय सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री व चित्रपट निर्माती आहे.
-
नेहाने मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू आणि मल्याळम चित्रपट तसेच लोकप्रिय मालिकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
-
काही दिवसांपूर्वीच नेहाची मुख्य भूमिका असलेला आणि जिजीविषा काळे दिग्दर्शित ‘तिघी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता.
-
या चित्रपटात नेहासह भारती आचरेकर, सोनाली कुलकर्णी, निपुण धर्माधिकारी, पुष्कराज चिरपुटकर, सुव्रत जोशी आणि संजय मोने यांसारख्या दिग्गज कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.
-
नुकतेच नेहाने केलेले एक नवं फोटोशूट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
-
या फोटोंमध्ये नेहाने सुंदर अशा गुलाबी रंगाचा प्लेन गाऊन परिधान केला असून तिचा हा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.
-
अत्यंत लहान वयातच बालकलाकार म्हणून नेहाने आपल्या अभिनय प्रवासाला सुरुवात केली होती.
-
(सर्व फोटो सौजन्य : नेहा पेंडसे/इन्स्टाग्राम)
बऱ्हाणपूरहून आणलेली १२ फुटाची गणेशमूर्ती वाटेतच दुभंगली; जळगावातील मंडळावर स्थापनेपूर्वीच विसर्जनाची वेळ