-
प्रसिद्ध मराठी अभिनेत्री साक्षी गांधी (Sakshee Gandhi) स्टार प्रवाह आणि झी मराठीवरील लोकप्रिय मालिकांमधील उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखली जाते.
-
साक्षी सध्या झी मराठी वाहिनीवरील ‘कृष्णाईच्या लेकी’ (Krushnaichya Leki TV Serial) या नव्या मालिकेत काम करत आहे.
-
या मालिकेत साक्षी ‘इंदुराणी’ ही महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसत आहे.
-
आपल्या सहजसुंदर अभिनय आणि निरागस व्यक्तिमत्त्वाने साक्षीने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे.
-
नुकतेच साक्षीने तिच्या या रॉयल लूकचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये साक्षीने परिधान केलेली हिरवी बनारसी साडी तिच्या सौंदर्याला शोभा देत आहे.
-
साक्षीने या फोटोंना “इंदुराणीला नडायचं काम नाही..!” असे हटके आणि रुबाबदार कॅप्शन दिले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : साक्षी गांधी/इन्स्टाग्राम)
रात्री झोपण्यापूर्वी हळदीचे दूध प्यायल्यास शरीरास कोणते फायदे मिळतात? वाचा डॉक्टरांचा सल्ला