-
पोटावरील चरबी कमी करून कंबर बारीक होण्यासाठी केवळ डाएट पुरेसे नसून योग्य व्यायामांची गरज असते.
-
रशियन ट्विस्ट (Russian Twist) : जमिनीवर बसा आणि पाठीचा वरचा भाग थोडा मागे झुकवा. पाय जमिनीपासून थोडे वर उचला. आता शरीराचा वरचा भाग एकदा उजवीकडे आणि एकदा डावीकडे फिरवा.
-
बायसिकल क्रंचेस (Bicycle Crunches) : पाठीवर झोपा आणि हात डोक्यामागे ठेवा. आपण सायकल चालवतो तसे पाय हलवा. पाय हलवताना डावा कोपरा उजव्या गुडघ्याला आणि उजवा कोपरा डाव्या गुडघ्याला टेकवण्याचा प्रयत्न करा.
-
प्लँक हिप डिप्स (Plank Hip Dips) : सर्वप्रथम कोपरावर (Elbow Plank) प्लँक पोझिशनमध्ये या. त्यानंतर तुमची कंबर एकदा उजवीकडे आणि एकदा डावीकडे जमिनीच्या दिशेने झुकवा.
-
माउंटेन क्लायम्बर्स (Mountain Climbers) : पुश-अप्सच्या पोझिशनमध्ये राहा. आता एकाच जागी टेकून पळाल्याप्रमाणे तुमचे गुडघे आलटून-पालटून छातीकडे आणा.
-
डंबेल साईड बेंड (Side Bends) : सरळ उभे राहा आणि एका हातात हलके वजन (डंबेल) घ्या. आता कंबरेतून हळूहळू एका बाजूला वाका आणि पुन्हा सरळ व्हा. हेच दुसऱ्या बाजूनेही करा.
-
उत्तम परिणामांसाठी हे व्यायाम आठवड्यातून किमान ४ ते ५ वेळा नक्की करा.
-
व्यायामाबरोबरच आहारात भरपूर फायबर आणि प्रोटीन असणारे पदार्थ घ्या, तसेच प्रक्रिया केलेले व तेलकट पदार्थ खाणे टाळा.
लालचुटूक डाळिंब आरोग्यासाठी ठरते वरदान; जाणून घ्या फायदे