-
लोकप्रिय मराठी अभिनेत्री शिवानी रांगोळे (Shivani Rangole) सध्या ‘भरत जाधव एंटरटेनमेंट’ निर्मित ‘शंकर जयकिशन’ (Shankar Jaykishan Marathi Natak) या नाटकामुळे चर्चेत आहे.
-
दिग्दर्शक सूरज पारसनीस यांचं ‘शंकर जयकिशन’ हे एक अतिशय सुंदर, कौटुंबिक, भावनिक आणि तितकंच विनोदी नाटक आहे.
-
या नाटकातील नात्यांची उत्तम गुंफण आणि हलका-फुलका विनोद प्रेक्षकांचे मनापासून मनोरंजन करत आहे.
-
या नाटकात शिवानीला भरत जाधव आणि महेश मांजरेकर यांसारख्या दिग्गज अभिनेत्यांबरोबर स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळाली असून ती यात मुख्य भूमिकेत दिसत आहे.
-
शिवानीने नुकतेच सोशल मीडियावर तिचे काही नवीन फोटो शेअर केले आहेत, ज्यांनी नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
या फोटोंमध्ये शिवानीने परिधान केलेला रोज गोल्ड रंगाचा सुंदर वन पीस ड्रेस तिच्या सौंदर्याला आणखी खुलवत असून तिच्या या लूकवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
-
विशेष म्हणजे, या नाटकाचे लेखन अभिनेता-दिग्दर्शक विराजस कुलकर्णीने केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिवानी रांगोळे/इन्स्टाग्राम)
रात्री झोपण्यापूर्वी हळदीचे दूध प्यायल्यास शरीरास कोणते फायदे मिळतात? वाचा डॉक्टरांचा सल्ला