-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘घरोघरी मातीच्या चुली’ या अत्यंत लोकप्रिय मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री धनश्री काडगावकर हिने आपल्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर घराघरांत आणि प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळविले आहे.
-
नुकतीच धनश्री मुंबईतील प्रसिद्ध वर्सोवा बीचवर फिरायला गेली होती आणि तिने तिथल्या निवांत क्षणांचा आनंद लुटला.
-
आपल्या या खास ट्रिपचे सुंदर फोटो धनश्रीने सोशल मीडियावर शेअर केले असून, त्या फोटोंना तिने ‘U beauty Mumbai …’ अशी कॅप्शन दिली आहे.
-
शेअर केलेल्या पहिल्या फोटोमध्ये धनश्रीने गुलाबी रंगाचा कॅज्युअल टी-शर्ट, गळ्यात सुंदर डिझाईनचा स्कार्फ परिधान केला असून तिच्या चेहऱ्यावर एक गोड आणि प्रसन्न हास्य दिसत आहे.
-
दुसऱ्या फोटोमध्ये धनश्री समुद्राच्या उसळणाऱ्या लाटांकडे शांतपणे पाहत असून ती अतिशय निवांत वाटत आहे.
-
तिने या सफरीदरम्यान घेतलेल्या गरमागरम आणि सुंदर कॉफी आर्ट असलेल्या कॉफीचा फोटो शेअर करून आपल्या मूडची झलक दाखवली आहे.
-
या सर्व फोटोंमध्ये तिचा साधा पण आकर्षक लूक, गुलाबी रंगाचा आऊटफिट आणितिच्या आरामदायक सँडल्स लक्ष वेधून घेत आहेत.
-
धनश्री काडगावकरचे हे वर्सोवा बीचवरील फोटो सध्या सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य: धनश्री काडगावकर/इन्स्टाग्राम)
रात्री झोपण्यापूर्वी हळदीचे दूध प्यायल्यास शरीरास कोणते फायदे मिळतात? वाचा डॉक्टरांचा सल्ला