-
मराठी चित्रपट आणि मालिकाविश्वात आपली वेगळी ओळख निर्माण करणारी लोकप्रिय अभिनेत्री अमृता खानविलकर ही तिच्या उत्तम अभिनयासाठी ओळखली जाते.
-
अमृताने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम करून आपल्या नृत्य आणि अभिनयाने रसिकांच्या मनावर राज्य केले आहे.
-
अलीकडेच अमृता खानविलकर हिने ताडोबा राष्ट्रीय उद्यानाला भेट देऊन तिथल्या जंगल सफारीचा आनंद लुटला आहे.
-
या खास जंगल सफारीदरम्यान घेतलेले काही अप्रतिम आणि दुर्मीळ फोटो तिने सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
-
या सुंदर फोटोंना तिने ‘The most magical moments of our very own #tigersafari’ अशी कॅप्शन दिली आहे.
-
शेअर केलेल्या या फोटोंमध्ये ताडोबा जंगलातील वाघ आणि त्यांच्या लहान बछड्यांचे अतिशय मनमोहक दृश्य पाहायला मिळत आहे.
-
एका फोटोमध्ये वाघीण आणि तिचे बछडे रस्त्यावरून फिरताना दिसत असून, वाघिणीसोबत तिचे पिल्लू खेळतानाचा एक अतिशय भावूक क्षणही कॅमेऱ्यात टिपला गेला आहे.
-
तिने शेअर केलेले वाघांचे हे दुर्मीळ फोटो आणि सफारीचे क्षण तिच्या चाहत्यांच्या भलतेच पसंतीस पडत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य: अमृता खानविलकर/इन्स्टाग्राम)
चपातीला तूप लावून खाल्ल्यानं कोणते आजार बरे होतात? त्याचे फायदे जाणून घ्या