-
उत्तम सुगंध तुमच्या लूकला अंतिम स्पर्श देऊ शकतो, पण सकाळी लावलेला सुगंध रात्रीपर्यंत टिकवण्यासाठी फक्त जास्त स्प्रे करून चालत नाही.
-
काही स्मार्ट सवयींमुळे तुमचा सुगंध जास्त काळ टिकेल, तो संतुलित राहील आणि तुम्ही जाल तिथे एक छान प्रसन्न सुवास दरवळत राहील.
-
मॉइश्चराइज्डपासून सुरुवात करा कोरड्या त्वचेवरून सुगंध लवकर उडून जातो, तर ओलसर आणि हायड्रेटेड त्वचा सुगंधाला धरून ठेवण्यास मदत करते.
-
अंघोळीनंतर लगेचच लावा स्वच्छ आणि थोडी ओलसर त्वचा सुगंधासाठी उत्तम मानली जाते, त्यामुळे अंघोळीनंतर त्वचा टिपून घेऊन मॉइश्चरायझर लावावे आणि मग स्प्रे करावा.
-
तुमचे पल्स पॉईंट्स ओळखा फक्त मनगटच नाही, तर मान, कानांच्या मागे, कोपराच्या आतील बाजू आणि छातीचा वरचा भाग यांसारख्या पल्स पॉईंट्सपैकी दोन-तीन जागा सुगंधासाठी निवडाव्यात.
-
सुगंधाचे टप्पे (लेयरिंग) रणनीतिकदृष्ट्या ठरवा अनेक वेगळे परफ्यूम एकत्र न वापरता अनसेंटेड (बिनवासाचे) किंवा हलक्या वासाचे बॉडी वॉश आणि लोशन वापरून त्यासोबत तुमचा मुख्य परफ्यूम वापरावा.
-
हवामानाकडे लक्ष द्या उष्णता आणि कोरडेपणामुळे सुगंध लवकर गायब होऊ शकतो, त्यामुळे उन्हाळ्यातील आणि हिवाळ्यातील सुगंध वापरण्याची पद्धत वेगळी असावी.
-
( टीप : येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक महितीकरिता तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
-
(सर्व फोटो सौजन्य : फ्रीपिक)
रात्री झोपण्यापूर्वी हळदीचे दूध प्यायल्यास शरीरास कोणते फायदे मिळतात? वाचा डॉक्टरांचा सल्ला