-
नुकताच श्रवाण महिना सुरू झाला आहे. पवित्र श्रावण महिन्यात उपवासाचे महत्त्व विशेष असून, या काळात साबुदाण्यापासून विविध चविष्ट व पौष्टिक पदार्थ तयार केले जातात.
-
साबुदाणा खिचडी
भिजवलेला साबुदाणा, भाजलेले शेंगदाणे, उकडलेले बटाटे, हिरवी मिरची आणि जिऱ्याची खमंग फोडणी देऊन वरून लिंबू आणि कोथिंबीर भुरभुरून ही लोकप्रिय खिचडी बनवली जाते. -
साबुदाणा वडा
भिजवलेला साबुदाणा, उकडलेला बटाटा, शेंगदाण्याचा कूट आणि हिरवी मिरची एकत्र करून तळून काढलेला हा कुरकुरीत वडा नारळाच्या चटणीसोबत मनाला तृप्त करतो. -
साबुदाणा खीर
दुधात साबुदाणा शिजवून त्यात साखर, वेलची, केशर आणि ड्रायफ्रूट्स घालून तयार केलेली ही गोड खीर उपवासाचा गोडवा वाढवते. -
साबुदाणा थालीपीठ
साबुदाणा, बटाटा आणि शेंगदाण्याच्या कूटामध्ये तिखट-मीठ मिसळून तव्यावर खरपूस भाजलेले हे थालीपीठ दह्यासोबत अतिशय स्वादिष्ट लागते. -
साबुदाणा टिक्की
कमी तेलात शॅलो फ्राय करून बनवलेली ही कुरकुरीत साबुदाणा टिक्की संध्याकाळच्या उपवासाच्या नाश्त्यासाठी एक उत्तम आणि आरोग्यादायी पर्याय आहे. -
कर्बोदकांनी समृद्ध आणि पचायला हलका असलेला साबुदाणा उपवासाच्या दिवसांत शरीराला तत्काळ ऊर्जा देण्याचे काम करतो.
-
या सर्व पारंपरिक आणि सोप्या साबुदाण्याच्या पाककृतींमुळे श्रावण महिन्यातील उपवासाचा आहार अधिक चविष्ट आणि विविधतापूर्ण बनतो.
-
(सर्व फोटो सौजन्य : AI)
चपातीला तूप लावून खाल्ल्यानं कोणते आजार बरे होतात? त्याचे फायदे जाणून घ्या