-
प्रसिद्ध अभिनेत्री सारा अली खान हिने नुकताच १२ ऑगस्ट रोजी आपला ३१ वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला.
-
तिने आपल्या वाढदिवसाचे खास क्षण सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
-
या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये सारा आपल्या आई आणि भावाबरोबर आनंदाने वेळ घालवताना दिसून येत आहे.
-
साराने तिच्या वाढदिवसानिमित्त एका ‘कार्निव्हल’ थीमच्या पार्टीचे आयोजन केले होते.
-
या खास प्रसंगी तिने केक कापून वाढदिवसाचे सेलिब्रेशन अत्यंत आनंदात पूर्ण केले.
-
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये सारा तिच्या कुटुंबासोबत खूप आनंदी दिसत आहे.
-
तिने आपल्या पोस्टला ‘Blessed to be surrounded with people that know me 100% but are cool (insane) enough to stick around anyway’ अशी कॅप्शन दिली आहे.
-
तिने शेअर केलेल्या फोटोंवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत असून तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य: सारा अली खान/इन्स्टाग्राम)
रात्री झोपण्यापूर्वी हळदीचे दूध प्यायल्यास शरीरास कोणते फायदे मिळतात? वाचा डॉक्टरांचा सल्ला