-
मराठी चित्रपट व मालिका विश्वातील लाडकी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘पाठराखीण’मध्ये मुख्य भूमिकेत दिसून येत आहे.
-
मालिकेत नुकताच प्राजक्ताच्या पात्राचा साखरपुड्याचा विशेष भाग चित्रित करण्यात आला असून त्यासाठी तिने हा आकर्षक लूक साकारला आहे.
-
या विशेष प्रसंगासाठी प्राजक्ताने परिधान केलेली गुलाबी आणि सोनेरी काठांची साडी तिच्या सौंदर्याला विशेष उजळवून टाकत आहे.
-
गुलाबी रंगाच्या या सुरेख साडीवर तिने परिधान केलेले मॅचिंग एम्ब्रॉयडरी डिझाईनचे ब्लाऊज या संपूर्ण लूकला अधिक आकर्षक बनवते.
-
प्राजक्ताने गळ्यात घातलेला सुरेख मोत्यांचा व खड्यांचा चोकर नेकलेस तिच्या या पारंपरिक लूकला अत्यंत राजेशाही स्वरूप देतो.
-
कानातील नक्षीदार झुमके आणि त्याला जोडलेली साखळी तिची हेअरस्टाईल आणि चेहऱ्याची शोभा आणखी वाढवत आहे.
-
नाकात परिधान केलेली पारंपरिक मोत्यांची नथ तिच्या मराठमोळ्या सौंदर्यात भर घालत असून रसिकांचे लक्ष वेधून घेत आहे.
-
प्राजक्ताचा हा मनमोहक आणि पारंपरिक अवतार तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरला असून सोशल मीडियावर तिच्या या लूकची जोरदार चर्चा सुरू आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: प्राजक्ता गायकवाड/इन्स्टाग्राम)
रात्री झोपण्यापूर्वी हळदीचे दूध प्यायल्यास शरीरास कोणते फायदे मिळतात? वाचा डॉक्टरांचा सल्ला