-
स्टार प्रवाह वाहिनीवर १० ऑगस्टपासून ‘आमच्या लाडक्या नाईक बाई’ ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. या मालिकेत अभिनेत्री अमृता धोंगडे ‘दर्शना लाड’ या नकारात्मक भूमिकेत दिसत आहे.
-
अमृताने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली असून, तिच्या या लूकची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.
-
या लूकसाठी अमृताने मरून रंगाची काठापदराची पारंपरिक पैठणी साडी नेसली असून, त्यावर सोनेरी बुट्ट्यांची सुबक नक्षी आहे.
-
साडीवर तिने परिधान केलेला डिझायनर ब्लाऊज अत्यंत खास आहे आणि पाठीमागे सुंदर कट-आउट डिझाईन देण्यात आले आहे.
-
दागिन्यांची निवड करताना अमृताने गळ्यात एक सुंदर चोकर नेकलेस परिधान केला असून, सोबतीला एक लांब मोत्यांचा हार परिधान केला आहे.
-
तिच्या चेहऱ्याचे सौंदर्य खुलवण्यासाठी तिने नाकात मोती व हिरव्या खड्यांची पारंपरिक नथ घातली असून, कपाळावर सुरेख चंद्रकोर लावली आहे.
-
केसांचा आकर्षक अंबाडा बांधून, त्यावर पारंपरिक हेअर ॲक्सेसरीज माळल्या आहेत, ज्यामुळे तिचा हा लूक अधिकच रुबाबदार आणि प्रभावी दिसत आहे.
-
अमृताचा हा आक्रमक आणि तितकाच ग्लॅमरस अंदाज सध्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असून, तिच्या पोस्टवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: अमृता धोंगडे/इन्स्टाग्राम)
३ दिवसांपासून आतड्यात कुजतोय मल? हे छोटे काळे फळ खा, पोट होईल साफ