-
लोकप्रिय मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे ही आपल्या उत्कृष्ट अभिनय आणि सौंदर्याच्या बळावर नेहमीच चाहत्यांच्या मनावर राज्य करीत असते.
-
नुकतीच तिने सोशल मीडियावर तिच्या मंदिरातील देवदर्शनाची एक सुंदर पोस्ट चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
-
या पोस्टमध्ये प्रार्थना बेहेरे भव्य आणि ऐतिहासिक अशा श्री बालाजी मंदिराच्या परिसरात नतमस्तक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
-
या पवित्र आणि धार्मिक भेटीदरम्यान प्रार्थनाने अत्यंत साधा, पण अत्यंत आकर्षक असा पारंपरिक पोशाख परिधान केला आहे.
-
कपाळावर लाल टिळा आणि चेहऱ्यावरील प्रसन्न हास्य तिच्या या मंदिरामधील लूकला अधिकच खुलवत आहे.
-
या खास फोटोंना कॅप्शन देताना तिने लिहिले आहे, ‘मनात कृतज्ञता, शब्दांत नम्रता आणि कृतीत माणुसकी — यापेक्षा सुंदर जीवनमूल्य दुसरं नाही.’
-
प्रार्थनाची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, चाहत्यांना तिचा हा शांत अंदाज खूप आवडला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: प्रार्थना बेहेरे/इन्स्टाग्राम)
तिलारी खोऱ्यात दुर्मिळ ‘वनमानवा’चे (स्लेंडर लॉरिस) दर्शन; जैवविविधतेचे रक्षण करण्याची पर्यावरणप्रेमींची मागणी