-
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री भाग्यश्री मिलिंद हिने बालक पालक या प्रसिद्ध चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात आपले एक वेगळे स्थान निर्माण केले होते.
-
नुकताच पार पडलेल्या बहुप्रतीक्षित मराठी फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्री भाग्यश्री मिलिंदने विशेष उपस्थिती लावली होती.
-
भाग्यश्रीने तिच्या या सुंदर लूकचे आकर्षक फोटो सोशल मीडिया अकाउंटवरून चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
-
तिने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती हलक्या गुलाबी रंगाच्या (पेस्टेल पिंक) स्टायलिश आऊटफिटमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे.
-
या आऊटफिटवर एम्ब्रॉयडरी केलेले पाम ट्री (माड) डिझाईन तिच्या लूकला एक आधुनिक आणि वेगळा टच देत आहे.
-
आपले हे फोटो पोस्ट करताना तिने ‘A little grace, a little mystery and a whole lot of magic’ अशी खास आणि अर्थपूर्ण कॅप्शन दिली आहे.
-
मोकळे कुरळे केस, नाजूक दागिने व मिनिमल मेकअपमुळे तिचा हा लूक अत्यंत सोबर आणि आकर्षक वाटत आहे.
-
चाहत्यांनी तिच्या या लूकवर आणि कॅप्शनवर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत तिच्या सौंदर्याचे भरभरून कौतुक केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: भाग्यश्री मिलिंद/इन्स्टाग्राम)
Raghuram Rajan: “रघुराम राजन यांची रणनीती भारताला मेक्सिको बनवेल!” झोहोच्या श्रीधर वेंबूंची टीका, औद्योगिक धोरणावरून नवा वाद