-
मराठी अभिनेत्री व ‘बिग बॉस’ विजेती तन्वी कोलते चाकरी या नवीन म्युझिक व्हिडीओच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे.
-
या म्युझिक व्हिडीओमध्ये तन्वीसोबत अभिनेता प्रणीत काळोखे मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहे.
-
तन्वीने नुकतेच सोशल मीडियावर प्रणीतसोबतचे काही सुंदर आणि खास फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
-
तिने आकाशी निळ्या रंगाची जरीचा काठ असलेली सुंदर सिल्क पैठणी परिधान केली आहे.
-
या लूकला अधिक पारंपरिक स्पर्श देण्यासाठी तिने केसांत पांढरा गजरा माळला असून, मोत्यांचे झुमके आणि जुळणाऱ्या बांगड्या घातल्या आहेत.
-
हे फोटो पोस्ट करताना तिने ‘आमच्या प्रेमाची चाकरी अजूनही चालूच आहे’ अशी सुरेख कॅप्शन दिली आहे.
-
फोटोंमधील दोघांची केमिस्ट्री आणि एकमेकांकडे पाहण्याची गोड शैली चाहत्यांच्या विशेष पसंतीस पडत आहे.
-
तन्वी आणि प्रणीतची ही जोडी आणि त्यांचा हा नवीन अंदाज सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: तन्वी कोलते/इन्स्टाग्राम)
चाणक्य नीती सांगते ‘या’ गुणांमुळे कुटुंबात नेहमी नांदते सुख-समृद्धी; प्रत्येक सदस्य करतो प्रगती