-
लोकप्रिय मराठी अभिनेत्री स्पृहा जोशीने तिच्या उत्कृष्ट अभिनयाद्वारे प्रेक्षकांच्या मनात हक्काचे स्थान निर्माण केले आहे.
-
स्पृहा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. नुकतेच तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून साडीवरील काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये तिने राखाडी रंगाची सुरेख साडी परिधान केली आहे, ज्याच्या पदरावर आकर्षक जांभळ्या रंगाची नक्षी आहे.
-
या साडीवर तिने निळ्या आणि लाल रंगाच्या बुट्ट्यांची नक्षी असलेला ब्लाऊज परिधान केला आहे.
-
नाकात नथ, कानात छोटी कुडले आणि हातात सोनेरी कडे घालून तिने आपला पारंपरिक लूक पूर्ण केला आहे.
-
हलकासा मेकअप आणि कपाळावर छोटीशी टिकली लावून स्पृहा या मराठमोळ्या रूपात अतिशय सुंदर दिसत आहे.
-
एस्सेल ग्रुपला १०० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी स्पृहाने हा खास लूक केला होता.
-
चाहत्यांनी तिच्या या लूकवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करीत तिचे भरभरून कौतुक केले असून, हे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य: स्पृहा जोशी/इन्स्टाग्राम)
रात्री झोपण्यापूर्वी हळदीचे दूध प्यायल्यास शरीरास कोणते फायदे मिळतात? वाचा डॉक्टरांचा सल्ला