-
तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांच्या हस्ते चेन्नईतील ऐतिहासिक फोर्ट सेंट जॉर्ज येथे स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात मोठ्या उत्साहात ध्वजारोहण पार पडले.
-
या सोहळ्याला दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री त्रिशा कृष्णनने विशेष उपस्थिती लावून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
-
स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यानंतर त्रिशाने आपल्या या खास पारंपरिक लूकचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
या सोहळ्यासाठी त्रिशाने अत्यंत सुंदर आणि आकर्षक पिवळ्या (मस्टर्ड यलो) रंगाची सिल्क साडी परिधान केली होती.
-
या पिवळ्या साडीवर तिने हिरव्या रंगाचा बारीक स्ट्रिप्स आणि टिकलीचे काम असलेला डिझायनर ब्लाऊज मॅच केला होता.
-
आपला हा पारंपरिक लूक पूर्ण करण्यासाठी तिने कानामध्ये मोत्यांचे आणि हिरव्या खड्यांचे सुंदर झुमके परिधान केले होते.
-
केशभूषेबद्दल सांगायचे तर, तिने केसांची सुंदर वेणी बांधून, त्यावर पांढऱ्या मोगऱ्याचा गजरा माळला होता.
-
त्रिशाचा हा नटखट आणि सोज्वळ पारंपरिक लूक स्वातंत्र्यदिनाच्या या सोहळ्यात उपस्थितांच्या विशेष पसंतीस पडला.
-
सर्व फोटो सौजन्य: प्रार्थना बेहेरे/इन्स्टाग्राम)
चपातीला तूप लावून खाल्ल्यानं कोणते आजार बरे होतात? त्याचे फायदे जाणून घ्या